लोकहो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का!?

लोकाहो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का!?


Dedicated to the lotus feet of the "Father of Indian Revolution!"

 

आज २३ जुलै २०२३. आज आपण सर्वजण साजरा करत आहोत लोकमान्य टिळक ह्यांची १६७वी जयंती. लोकमान्य टिळक हे कोण होते, काय होते आपल्या सर्वांनाच चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या बद्दल ऐक्ल्यावर  आठवतात त्यांनी स्वतःच किवा केसरीच्या माध्यमातून केलेले, अखंड शरीररत अग्नि संचार करवणारी त्यांची विधाने. "स्वराज्य! हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" आपल्या सर्वांना आठवतं ते चाफेकर बंधूंनी "गोंद्या आला रे!" अशी मारलेली हाक आणि रचलेला इतिहास आणि अजून एक वाक्य आहे ज्याचे उलेख आज ही विपक्षातील नेते सरकारांवर निशाणा साधण्यासाठी करतात, कोणते बरे? "सरकारचे डोके ठिकाणा वर आहे का!?" त्या वेळेस टिळकांनी सरकारावर केलेलं विधान आज मी तुमच्यावर उलटे फिरवत आहे! टिळकांना त्यांच्या जीवनात स्वातंत्र्य अनुभवता देखिल आला नाही पण आपण आज राहत आहोत एका स्वतंत्र देशात ज्याला स्वातंत्र्य प्राप्ती झाली १९४७ मध्ये व आपण संविधानात्मक झालो ते १९५० मध्ये आपण लोकतंत्र (डेमॉक्रेसी) चा मार्ग निवडला, जे माझ्याप्रमाणे योग्यच आहे. पण, लोकशाही खरोखरच आहे का? हा प्रश्न मला निरंतर पडत असतो. सर्वप्रथम तर त्या काळात जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचा वर अन्याय झाला होता, त्याच क्षणी आपल्या देशातील लोकशाही ठार झाली होती. आपल्या संविधानात आणि बाणी जाहीर करण्याची परवानगी ही राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या सल्यानी अस्ते पण काही विशिष्ट कारण असल्यासच  पण १९७५ मध्ये इंदिरा गांधी ह्यानी स्वतःच्या विशिष्ट हेतूं करीता आणि बाणी जाहीर केली आणि तेव्हा लोकशाही चा दुसर्‍यांदा खुन झाला. तेव्हा चला १९४७, १९५०, १९७५ मध्ये लोक एवढे शिकलेले नव्हते व लवकर बातम्या कळण्यासाठी जास्त माध्यमेही नव्हती पण आजच्या काळात जेव्हा आपल्या समोर लोकशाहीचं विलेवाट उडवली जात आहे, त्या वेळी आपण सर्व गप्पा का? एक तर आधी निवडून आलेले पक्ष दुसर्‍या विचारधारेच्या पक्षांसोबत जाऊन युती करतात, सरकार बनवतात आणि मग तेच सरकार त्यातील काही बडे नेते बंड करतात आणि परत आपल्या जुन्या सवंगड्यां सोबत जाऊन युती करून नवीन सरकार बनवतात. हाच धक्का सहन होत नाही तो वर आता पर्यंत विपक्षातील बडे नेते एक गट घेऊन सत्ताधारी पक्ष कडे जातात आणि स्वतःला अनेक मंत्री पदांनी भूषवतात आणि आपण लोक काय करतो एक तर बोलतो सगळं ओक मधे एकदम! नाही तर म्हणतो एक तिसरा बडा नेता आहे त्याला संधी द्यायला हवी. अरे, "लोकाहो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का!" तुम्ही केलेल्या मताची काडीमात्र किम्मत नाही. जागे व्हा लोकहो, आपल्याला एक असा कायदा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने बनवून घ्यायचा आहे की जेणे करून आपल्या सर्वांनी निवडून आणलेले सरकार हे ५ वर्षात कोणीही बदलू शकणार नाही आणि अजून एक कायदा आपल्याला आणण्याचा प्रयत्न करु तो म्हणजे सगळ्या निवडणुकी एकत्र करण्याचा म्हणजे विधान सभा, लोक सभा आणि अगदी ग्राम पंचायतींची ही निवडणुक एकत्र उरखून टाकल्या की मग पुढील ५ वर्षे हे नेते मंडळी निवडणुकी जिंकण्याचं प्रयोजन करण्या ऐवजी राष्ट्र हितासाठी नियोजन करतील, अशी अपेक्षा करता येईल. जर आपण लवकरच जागे नाही झालो तर आपल्याला आपल्या देशात तानाशाही बघावी लागणार आहे आणि आपल्यातील काही लोक सध्याच नेतृत्व बघून म्हणतील की "आम्हाला चालतील हे तानाशाहा म्हणून" चला एखाद वेळ हे चालतील पण कश्यावरून भविष्यत त्या सर्वोच्च गाधी वर औरंगजेब सारखे चरित्र असणारा माणूस बसणार नाही!?






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Malvan: An Indelible Trip!

Bhavsagar: The Cosmic Ocean!!!

Lord Vitthala!