लोकहो, तुमचे डोके ठिकाणावर आहे का!?

लोकाहो , तुमचे डोके ठिकाणावर आहे का! ? Dedicated to the lotus feet of the "Father of Indian Revolution!" आज २३ जुलै २०२३. आज आपण सर्वजण साजरा करत आहोत लोकमान्य टिळक ह्यांची १६७वी जयंती. लोकमान्य टिळक हे कोण होते , काय होते आपल्या सर्वांनाच चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या बद्दल ऐक्ल्यावर आठवतात त्यांनी स्वतःच किवा केसरीच्या माध्यमातून केलेले , अखंड शरीररत अग्नि संचार करवणारी त्यांची विधाने. "स्वराज्य! हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" आपल्या सर्वांना आठवतं ते चाफेकर बंधूंनी "गोंद्या आला रे!" अशी मारलेली हाक आणि रचलेला इतिहास आणि अजून एक वाक्य आहे ज्याचे उलेख आज ही विपक्षातील नेते सरकारांवर निशाणा साधण्यासाठी करतात , कोणते बरे ? " सरकारचे डोके ठिकाणा वर आहे का! ?" त्या वेळेस टिळकांनी सरकारावर केलेलं विधान आज मी तुमच्यावर उलटे फिरवत आहे! टिळकांना त्यांच्या जीवनात स्वातंत्र्य अनुभवता देखिल आला नाही पण आपण आज राहत आहोत एका स्वतंत्र देशात ज्याला स्वातंत्र्य प्राप्ती झाली १९४७ मध्ये व आपण संविधानात्मक झालो ते १९५० मध्ये आपण लोकतंत्र (ड...